कविता वाचन हा खूप 'सब्जेक्टिव' विषय आहे. लहानपणापासून 'कॉनवेंट' शाळे मध्ये शिकल्यामुळे मराठी वाचनाचा कधी फारसा संबंध आला नाही. पण गेली १० वर्ष 'पुण्यात' राहत असल्यामुळे माझ्यातल मराठीपण बर्याच प्रमाणात जागृत झालय...निदान अस म्हणायला हरकत नाही.......................सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत आमच्या पिढीला लाभल्यामुळे मराठी कवीताना एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे.....
हाच दृष्टिकोन पुढे नेत मला ह्या ब्लॉग ची कल्पना सुचली....अर्थात तसे ऑर्कुट, फेसबुक या सोशल साइट्स आणि बरेच इतर ब्लॉग वर चांगले नव-नवीन कविता आणि लेख वाचायला मिळतात...पण ह्या ब्लॉग मध्ये मला आवडलेल्या आणि भावलेल्या कविता आहेत....वाचकांनी याचा आस्वाद घ्यावा....................!!!
ब्लॉग ची सुरूवात सुधीर मोघे यांच्या कविता नी करत आहे.....आयुष्यातल एक अचूक सत्य सांगणारी कविता आहे.............!!!
प्रत्येक जन्मनारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते
लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते
तो गंध, तो फुलोरा, अंती धुलिस मिळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
जे वाटती अतूट, जाती तुटून नाते
आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो.......
उगमाकडेच वळतो..........................!!
प्रत्येक जन्मनारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
Hi kavitechi agdi achuk nivad ahe. Sudhir Moghe mazehi avadte kavi ahet. Khup varshanpurvi tyancha kavitecha karyakram aikla hota. nantar yog ala nahi. Convent madhe shikunahi tumhala kavitechi avad ahe..he vishesh hoy. Ashach raha. kavita mansache jagne sundar karte.
ReplyDeleteSHARAD.