सगळेच जे प्रेम करतात ते दाखवत नाही....पण काही जे प्रेम करतात ते कळू पण देत नाही....शुभ्र, निरभ्र, आणि उदात्त अशी या लोकांची मन असतात....जेव्हा कुठली गोष्ट मिळायचा अगोदरच हातातून निसटून जाणार असते, तेव्हा 'समंजसपणा' याला शस्त्र घेऊन लढायचा असत.....
ही कविता, मी काही वर्षांपूर्वी लिहिली होती, अशाच काही समंजस माणसांसाठी, जे माझ्या आयुष्यात आले आणि माझ आयुष्य समृध करून गेले..........!!!
केलास कशाला अट्टाहास मग...??
होतास की मग्न जगण्यात...
होताच की हृदयाला तुझा ठोका...
होती की इँद्रीये जिथल्या तिथे...
दिलीस का साद त्या अत्रुप्त आशेला??
दिलेस का रंग त्या विस्म्रुतित्ल्य स्वाप्नांना??
दिलेस का शब्द त्या मुक्या भाषेला??
दिलास का स्वतःमधल्या स्वताहाला एक वेगळाच जन्म??
एवढा सार् करून.......................
फरक पडला....
तो फक्त तुलाच......
साद ऐकू आली......ती फक्त तुलाच.....
स्वप्ने तुझी.....सप्तरंगी वाटली......ती फक्त तुलाच.....
अनाकलनीय भाषा ती.......कळली पण फक्त तुलाच.......
अजुन काय......नव्या जन्मातला हरवलेला ठोका पण......
तुझा तुलाच सापडला........
वेडाच बारा होतास.....
का केलास या शहाणपणाचा अट्टाहास??
अट्टाहासच करायचा होता......
तर हे सर्व लपवण्याचा तरी......
काही गहीवरलेले क्षण.......नसते गोठले मग.....!!
गुदमरलेले काही निश्वास.....सुटले नसते मग....!!
No comments:
Post a Comment