माझी आजूनपर्यंत सर्वात लाडकी कवीता......!!! एका अविवाहित आईच्या बाळाची ही कवीता आहे.......
आभार,
शतश: आभार
जन्मदात्या माते
तुझ या काही तासाच्याच जन्माच ऋण
कितीतरी वर्षांचाही जन्मात
फिटन्यासारख नाही............
म्हणूनच आभार
माझ काही वर्षांच आयुष्य
काही तासातच संपविल्याबद्दल
हे आभार............................!!
एक बर केलास
नदीत ना टाकता विहिरितच टाकलस
नाहीतर मीही वाहत वाहत
कुणाच्या हाती लागले असते
कर्णसारखी.........................
म्हणूनच आभार.....................!!
खर तर नऊ महिन्यांचा भार तू सोसलास
यातच नाही का तुझ मोठेपण ??
माझ्या आयुष्याचा भार
तुझ्या प्रतिकार न करण्यार्या
दुबल्या हाताना पेलवला नसता
आणि तुझ दुबलेपण सोसता सोसता
मीही दुबली नसते का झाले ??
माझयात ती दुबली शक्ति येन्यापूर्वीच
मला संपविल्याबद्दल
आभार........................................!!
मला माहीत आहे
तू माझ्या भविष्याचाच विचार केला असणार
बूड नसलेल्या भांड्यासारख रिकाम आयुश्य
कुठेतरी कचर्यात कूजत राहण्यापेक्षा
आकार येण्यापूर्वीच संपविलस
म्हणून आभार................................!!
तुला आई तरी कस म्हणू ??
तो शब्द तुलाही उमजला नाही
मग मला कसा समजणार
जन्म देणारी एक स्त्री,
जन्म भोगणारी एक स्त्री,
भोगू देणारी एक स्त्री,
हे स्त्रित्वचे भोग नशिबी येन्यापूर्वीच
सारे भोग संपविल्याबद्दल
आभार....................................!!
काही तसांची का होईना
मी मोकली हवा घेतली,
हे उमजाण्यापूर्वीचे मोकळे श्वास,
उमज पडल्यानंतर गुदमरले असते
गुदमरून जगण्यापेक्षा
आधीच गुदमरवून संपवील्याबद्दल
हे आभार
शतश: आभार..............................!!!
महेश. पं. सोनावाणे
Saturday, March 20, 2010
Friday, March 19, 2010
उगम....!!!
कविता वाचन हा खूप 'सब्जेक्टिव' विषय आहे. लहानपणापासून 'कॉनवेंट' शाळे मध्ये शिकल्यामुळे मराठी वाचनाचा कधी फारसा संबंध आला नाही. पण गेली १० वर्ष 'पुण्यात' राहत असल्यामुळे माझ्यातल मराठीपण बर्याच प्रमाणात जागृत झालय...निदान अस म्हणायला हरकत नाही.......................सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत आमच्या पिढीला लाभल्यामुळे मराठी कवीताना एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे.....
हाच दृष्टिकोन पुढे नेत मला ह्या ब्लॉग ची कल्पना सुचली....अर्थात तसे ऑर्कुट, फेसबुक या सोशल साइट्स आणि बरेच इतर ब्लॉग वर चांगले नव-नवीन कविता आणि लेख वाचायला मिळतात...पण ह्या ब्लॉग मध्ये मला आवडलेल्या आणि भावलेल्या कविता आहेत....वाचकांनी याचा आस्वाद घ्यावा....................!!!
ब्लॉग ची सुरूवात सुधीर मोघे यांच्या कविता नी करत आहे.....आयुष्यातल एक अचूक सत्य सांगणारी कविता आहे.............!!!
प्रत्येक जन्मनारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते
लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते
तो गंध, तो फुलोरा, अंती धुलिस मिळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
जे वाटती अतूट, जाती तुटून नाते
आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो.......
उगमाकडेच वळतो..........................!!

Subscribe to:
Posts (Atom)